आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरच्या अमानुष हत्त्येच्या घटनेचा तळेगाव येथे निषेध

108 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 2 months ago
Date : Sun Aug 18 2024

image..



तळेगाव दाभाडे : दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कलकत्ता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरची अमानुष हत्त्या या घटनेचा निषेध म्हणून वैद्यकीय महाविद्यालय परिसर व तळेगाव शहरामध्ये कँडल मार्च काढला होता. यावेळी ८०० ते ९०० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.


कँडल मार्च नंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे या घटनेबद्दल तीव्र मनोगत व्यक्त केले व डॉ. संध्या कुलकर्णी प्राचार्य यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कँडल मार्च साठी संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ तुषार खाचणे, प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनीही सहभाग घेतला होता.