तुंगार्ली धरणात बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

254 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 9 months ago
Date : Thu Feb 08 2024

image...

लोणावळा : लोणावळा शहरा जवळच्या तुंगार्ली धरणात बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. ५) रोजी ही घटना घडली. त्यानंतर मंगळवारी (दि. ६) बुडलेल्या तरुणाचा रेस्क्यू पथकाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे .

अभिषेक सिंह रावत (वय २२, रा. उत्तराखंड) असे सदर मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा (ता. मावळ) शहरातील पर्यटन व तुंगार्ली धरण परिसर फिरण्यासाठी चार मित्र आले असता पाण्यात पोहण्याचा मोह अनावर झाल्याने ते पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिषेक रावत हा पाण्यात बुडू लागला. ही घटना लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला अन् बघता बघता स्थानिक नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मात्र अभिषेक याला वाचवण्यात अपयश आल्याने लोणावळा शहर पोलिसांनी शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केले. त्यानंतर मंगळवारी (दि. ६) बुडलेल्या तरुणाचा रेस्क्यू पथकाने

मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सदर घटनेचा पुढील तपासलोणावळा शहर पोलीस करत आहेत.