125 views
...
मावळ तालुक्यातील (Maval) कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज (शुक्रवारी, दि. 22) शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर त्याच्या आईला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (रा. कोथुर्णे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे 2 ऑगस्ट 2022 रोजी अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी (Maval) तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24तासाच्या आत आरोपी तेजस दळवीला अटक केली होती.