कामगाराने केला सुपरवायझरचा खून...

784 views

मावळातील धक्कादायक घटना


Author : Admin
Publisher : Admin
Update : 3 weeks ago
Date : Thu Mar 21 2024

image

वडगाव मावळ :- माने ऍग्रो कंपनी सुपरवायझर काम सांगत असल्याचा राग मनात कामगार व त्याच्या साथीदाराने दुचाकीवरून पाठलाग स्टील पाईपने गंभीर जखमी करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.१९) सायंकाळी ५.३० वा. माने ऍग्रो जवळ बेबड ओहळ-शिवणे रोड वर घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक भूमिपुत्र व बाहेरचा सुपरवायझर यातून खून झाला. आरोपी अटक केले आहेत.


सुधीर मच्छिंद्र अडसूळ (वय ४७, रा. बेबड ओहळ ता. मावळ मूळगाव परभणी) खून झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे.


आरोपी कुमार भगवान ओझरकर (वय २७, शिवणे ता. मावळ जि. पुणे) व त्याचा अल्पवयीन साथीदार खुनाच्या गुन्ह्यात अटक आहेत.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सुपरवायझर सुधीर अडसूळ व आरोपी कुमार ओझरकर हे माने ऍग्रो मध्ये कामाला होते. सुपरवायझर अडसूळ हे आरोपी ओझरकर याला कंपनीत काम सांगत होते. त्याचा राग आरोपी कुमार ओझरकर याने मनात ठेवून मंगळवारी (दि. १९) सायंकाळी सुपरवायझर अडसूळ दुचाकीवरून घरी जात असताना, आरोपी ओझरकर व त्याचा साथीदार याने पाठलाग करून स्टील पाईपने डोक्यात सर्व अंगावर मारहाण करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात सोडून फरार झाले. घटनास्थळी शिरगाव परंदवडी पोलिसांनी धाव घेऊन गंभीर जखमी अडसूळ याला सोमाटणे फाटा पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान सुपरवायझर अडसूळ यांचा बुधवारी (दि.२०) सायंकाळी ५ वा.मृत्यू झाल्याचे घोषित केले.