रेल्वेच्या धडकेने अज्ञात इसमाचा मृत्यू

227 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 3 weeks ago
Date : Sun Aug 11 2024

imageसंग्रहित छायाचित्र


कामशेत : मुंबई पुणे लोहमार्गावर कामशेत शहराच्या हद्दीत डाऊन लाईनवर रेल्वेच्या धडकेने अज्ञात इसमाचा मृत्यू झाला आहे.


याप्रकरणी लोहमार्ग पोलीस फौजदार संजय तोडमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.११) पहाटे १२ च्या सुमारास कामशेत शहराच्या हद्दीत रेल्वे किलोमीटर नंबर १४३/३६ च्या जवळ गाडीखाली येऊन ४०-४५ वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाला. मजबूत बांधा, गोरा रंग, गोल चेहरा बारीक व काळे केस उंची सुमारे साडेपाच फूट उजव्या हातावर बदामात इंग्रजीत एस असे गोंदलेले आहे.

या इसमाच्या अंगात डार्क निळ्या रंगाचा टी-शर्ट काळया रंगाचे फॉर्मल पॅन्ट घातलेले असून या संदर्भात कोणाला ओळख पटल्यास तळेगाव दाभाडे लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा. याप्रकरणी पुढील तपास लोहमार्ग पोलीस संजय तोडमल करत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स