कोंबडी विकल्याच्या कारणावरून पती पत्नीत झालेल्या वादातून पतीने केली आत्महत्या..

577 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 4 months ago
Date : Tue Jun 11 2024

image

कोंबडी विकल्याच्या कारणावरून पती पत्नीत झालेल्या वादातून पतीने केली आत्महत्या..


वडगाव मावळ : घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून बायकोने बडबड केल्याचा राग मनात धरून नवऱ्याने नऊ दिवसांपूर्वी घरातून निघून जाऊन ब्राह्मणवाडी येथील डोंगरावर एका झाडाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गोंधन व कपड्यावरून मयताची ओळख पटवली.


मंगेश शिवाजी पवार (वय २६, रा. ठाकरवस्ती, डेक्कन हिल्सजवळ वडगाव मावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील शिवाजी ज्ञानू पवार (वय ४५) यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून रोजी मंगेश याने घरातील कोंबडी घरात कोणाला न सांगता नेऊन विकली होती. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्यास

बडबड केली. याचा राग आल्याने मंगेश हा दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला होता. दरम्यान, रविवारी (दि. ९) ब्राह्मणवाडी येथील डोंगरावर एका झाडाला प्रेत लटकलेल्या अवस्थेत असलेले गुराखी मुलांनी पाहिले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली

उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, हवालदार अजित ननावरे, पोलिस कर्मचारी प्रतीक राक्षे, देविदास भांगे, किरण ढोले, पोलिस पाटील ज्योती मोरे, पोलिस मित्र श्रीकांत गवादे, शशिकांत मोरे यांनी डोंगरावर धाव घेतली. त्याठिकाणी करंजाच्या झाडाला एक प्रेत लटकलेल्या अवस्थेत होते व मयताचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता.


कपड्यावरून ओळख पटली दरम्यान, पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी डोंगरावरून शव खाली आणली. मयताच्या उजव्या हाताच्या दंडावर असलेले गोंदण व अंगातील कपड्यावरून पोलिसांनी मयताची ओळख पटवली. त्यानंतर शवविच्छेदन करून शव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.