1726 views
लोणावळा : लोणावळा शहराच्या जवळच मळवली रेल्वे स्टेशन
पासून काही अंतरावर असलेल्या पाटण गावाच्या हद्दीमध्ये एका खाजगी बंगल्यात पॉर्न फिल्म बनवण्याचा उद्योग करणाऱ्या टोळीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून फिल्म अर्थात चित्रफीत बनवण्यासाठी लागणाऱ्या 6 लाख 72 हजार 620 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 18 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी पाटण गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या आर्णव व्हिला (ता. मावळ, जि. पुणे) या एका खाजगी बंगल्यात अश्लिल, नग्न व बिभीस्त व्हिडीयो तयार करण्याचा उद्योग सुरू असल्याची गोपनीय खबर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक तयार करून तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांना सदरच्या बंगल्यात संभोगाच्या बीभत्स चित्रफीत तयार करीत असलेली मंडळी रंगेहाथ मिळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून 5 महिला आणि 10 पुरुषांसह हा बंगला बेकायदेशीरपणे भाड्याने देणाऱ्या आणि तो चालवणारे 3 जण अशा एकूण 18 जणांना ताब्यात घेऊन चित्रफीत तयार करण्यासाठी वापरलेले दोन कॅमेरे, वेगवेगळ्या लाईट, वायरलेस माईक, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसचे पो.उप.नि. भारत भोसले यांनी याप्रकरणी सरकारी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून विष्णु मुन्नासाहब साओ (वय ३० वर्षे, रा. परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय ३५ वर्षे, रा. बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (वय २३ वर्षे, रा. रंगपुरी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय ३८ वर्षे, रा.मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (वय २१ वर्षे, रा. दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय २९वर्षे, रा. चंद्रपुर), समीर मेहताब आलम (वय २६ वर्षे, रा. अमरोहा, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेश चौबे (वय २९ वर्षे, रा. कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय २१ वर्षे, रा. रोनक सिटी, हरियाणा), विना भारत पोवळे (वय ३२ वर्षे, रा. खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (वय २८ वर्षे,
रा. नालासोपारा वेस्ट, पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय ३८ वर्षे, रा. वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय १९ वर्षे, सुरत, गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय २१ वर्षे, रा. डेहराडून) आणि मनीष हिरामण चौधरी (वय २० वर्षे, रा. शास्त्रीनगर, हरीयाणा) यांना प्रथम ताब्यात घेऊन त्यातील 13 पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांच्या विरोधात अश्लिल, नग्न व बिभीस्त चित्रीकरण करून त्या चित्रफिती अवैध वेबसाईट्स व मोबाईल अॅप्लीकेशनवर अपलोड करून प्रसारीत व प्रचारीत करण्याची व्यवस्था केल्याचा गुन्हा भादवि कलम 292,293,34., माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67,67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3,4,6,7 अन्वये दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय सुखदेव चांगदेव जाधव (वय ५२ वर्षे) आकेश गौतम शिंदे (वय ३२ वर्षे) व सनी विलास शेडगे (वय ३५ वर्षे, सर्व रा.मळवली, ता. मावळ, जि. पुणे) यांनी स्वतःचे आर्थिक फायदया करीता संबंधित पुरुष व महिलांना त्यांचे कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे न घेता, बंगल्यात पुरुष व त्यांच्या सोबतच्या महिलांचे संभोग करतानाचे तसेच अश्लिल व नग्न चित्रीकरण करून त्याच्या चित्रफिती तयार करत असल्याचे माहिती असताना देखील त्याबाबत पोलीसांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता नमुदचा बंगला अश्लिल, नग्न व बिभीस्त व्हिडीयो तयार करण्याकरीता भाड्याने दिल्याचा आरोप ठेवत करील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, लोणावळाउपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली आणि पो. नि. किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पो.उप.नि. भारत भोसले, सागर अरगडे, सहा.पो.उप.नि. अजय दरेकर, महेंद्र वाळुंजकर, युवराज बनसोडे, पो. हवा. बाळकृष्ण भोईर, दुर्गा जाधव, महिला पो.हवा. पुष्पा घुगे, महीला पो. ना. रुपाली पोहीनकर, पो. कॉ. सागर धनवे, सूरज गायकवाड यांनी केली.