हिंजवडीत IT इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या..

483 views

प्रेम संबंधांतून ही हत्या केल्याची माहिती...


Author : Admin
Publisher : Admin
Update : 10 months ago
Date : Mon Jan 29 2024

image..


पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात एका ओयो हॉटेलमध्ये आयटी इंजिनिअर महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री गोळ्या झाडून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वंदना द्विवेदी (वय-२५) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणात ऋषभ निगम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली वंदना द्विवेदी कामाला होती. ऋषभ निगम आणि तिचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर येत आहे. दोघेही लखनऊ येथील राहणारे असून, गेल्या दोन दिवसांपासून ते या हॉटेलमध्ये राहत होते.

मात्र, काही कारणावरून त्यांच्यात वाद झाले असावेत. त्या वादातून ऋषभ याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून त्याने येथील हॉटेलमध्ये वंदना हिची गोळ्या घालून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या केल्यानंतर ऋषभ निगम मुंबईला फरारी झाला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांना कळवले. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान अटक केली.


प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली असली, तरी पोलिसांकडून ही घटना रात्री किती वाजता घडली? हत्येचे नेमके कारण काय? याचा तपास सुरू आहे.