मृत झालेल्या बिबट्याचे अवयवांची चोरी .., विभागाच्यावतीने गुन्हा दाखल

203 views

...


Author : Admin
Publisher : Admin
Update : 9 months ago
Date : Sun Feb 11 2024

image..



पुणे, दि.११: वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. 


नवनाथ खांदवे यांच्या शेतात ८ फेब्रुवारी रोजी बिबट वन्यप्राणी मृत असल्याचे दिसून आल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत मादी बिबट वय अंदाजे १० महिने ताब्यात घेतले. ९ फेब्रुवारी रोजी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे पायाची ३ नखे व पंजा धारधार शस्त्राने कापून काढल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकच्या साहाय्याने तपास केला. 


ऊसतोडणी मजूर यांच्याकडे चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे ३ नखे व पायाचा पंजा व त्याचे १ नख अशी एकूण ४ नखे कोयता व सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच बिबटच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनविण्याचे उद्देशाने आकर्षणापोटी गुन्हा केल्याचे सांगितले. 


आरोपी कडून ४ बिबट नखे १ पायाचा पंजा व गुन्ह्यात वापरलेले २ सुरे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी कांतीलाल चांदरसिंग सोनवणे आणि २ बालअपचारी यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कारवाई पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वात सहा.वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केली.