वेळेचे बंधन न पाळणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची कारवाई

170 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 3 weeks ago
Date : Mon Aug 12 2024

imageसंग्रहित छायाचित्र


मावळ :- लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.यांचेकरिता प्रशासनाने वेळेचे बंधन घालुन दिलेले असतानाही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती कार्तिक यांना प्राप्त झाली होती.

त्याची खातरजमा करण्याकामी सत्यसाई कार्तिक हे दिनांक १०/०८/२०२४ रोजी मध्यरात्री त्यांचे पथकासह नमूद माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता कामशेत येथील १)दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील २) फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन्ही ठिकाणी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचे ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई.ची विक्री करताना मिळुन आल्याने नमूद दोन्ही बारमालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३३ (डब्ल्यू), १३१ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

पुढील तपास अनुक्रमें कामशेत व वडगाव मावळ पोलीस करत आहेत. तसेच अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढेदेखील सुरच राहणार असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.


सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह केली आहे.




लेटेस्ट अपडेट्स