उर्से टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान ५० लाखांची रोकड जप्त

681 views


Author : Admin
Publisher : Admin
Update : 3 weeks ago
Date : Tue Mar 26 2024

image..

मावळ :- शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या नाकाबंदी पथकाने उर्से टोल नाक्यावर 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली ही कारवाई मंगळवारी (दि.26) सायंकाळी 6 वा. उर्से टोल नाका ता. मावळ जि. पुणे हद्दीत केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या


आदेशान्वये लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने एकूण नऊ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. मंगळवारी (दि. 26) सायंकाळी 6 वा. उर्से टोल नाका, मावळ लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान,


शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक नईम शेख व त्यांचे पथका मार्फत वाहनांची तपासणी करत असताना महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीच्या तपासणीमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळून आली असून त्याबाबत योग्य खुलासा करता आला नाही. या कारणास्तव सदरची रक्कम शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन मार्फतीने जप्त करण्यात आलेली असून पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.