1136 views
..
मावळ :- ऐन दिवाळी निवडणूक काळात तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.1) सकाळी 7 वा. (प्रभाचीवाडी) महागाव ता.मावळ जि.पुणे हद्दीत घडली.
निलेश दत्तात्रय कडू वय 30 रा.सावंतवाडी महागाव ता.मावळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाचीवाडी महागाव हद्दीत अज्ञात व्यक्तींनी निलेश कडू यांचा दगडाने ठेचून खून करून फरार झाले. ही घटना गुरुवारी (दि.31) रात्री घडली असून शुक्रवारी (दि.1) सकाळी 7 वा. उघडकीस आली आहे. मयत हा भाजप विद्यार्थी पदाधिकारी होता.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व पोलीस अंमलदारांनी धाव घेऊ मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केला. काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
खुनातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे करत आहेत.