पोदार इंटरनॅशनल स्कूल तळेगावचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा..

413 views

कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांची प्रमुख उपस्थिती.


Author : Admin
Publisher : Admin
Update : 10 months ago
Date : Fri Feb 02 2024

image...






वडगाव मावळ:- पोदार इंटरनॅशनल स्कूल तळेगाव विद्यालयाचा ८ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवार, दि. २८ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी या ठिकाणी तीन टप्यांमध्ये साजरा करण्यात आला. पहिला टप्पा पोदार प्रेप - नर्सरी ते सिनियर के.जी. यांचा सकाळी तसेच दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाचा दुपारी आणि इयत्ता पाचवी ते दहावी वर्गाचा वार्षिक स्नेहसंमेलन संध्याकाळी मोठ्या उत्साहात साजरा झाला.

विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 'तेनाली रामा' या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. हे स्नेहसंमेलन केवळ नाटय, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले व विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे भरभरून कौतूक देखील केले.


या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. फ्रँकलिन सर (जनरल मॅनेजर, पुणे विभाग), श्री. मुनिष शर्मा (मुख्याध्यापक - पोदार इंटरनॅशनल स्कूल वाघोली), श्री. मंगेश जगताप (मुख्याध्यापक - पोदार इंटरनॅशनल स्कूल अहमदनगर), श्री.संजीव भारद्वाज (मुख्याध्यापक - पोदार इंटरनॅशनल स्कूल रोहकल), श्रीमती. शेहनाज कोटार (मुख्याध्यापिका - पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड), श्रीमती, स्मिता पॅटरसन (मुख्याध्यापिका - पोदार इंटरनॅशनल स्कूल पिंपरी), श्री.अग्नेल कारव्हालो (मुख्याध्यापक - पोदार इंटरनॅशनल स्कूल वाकड), श्री. विशाल जाधव (मुख्याध्यापक - पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंड), श्रीमती. मीनल वैद्य (मुख्याध्यापिका - पोदार इंटरनॅशनल स्कूल मांजरी), श्री. ए. के. सिंग (मुख्याध्यापक - पोदार इंटरनॅशनल स्कूल हडपसर), श्रीमती. नीता कुमार (सी.आय.ई. - वाकड), श्रीमती. सिमरन कौर (मुख्याध्यापिका - पोदार इंटरनॅशनल स्कूल चाकण), श्री. कुलकर्णी ( मुख्याध्यापक - पोदार इंटरनॅशनल स्कूल बारामती) श्री.बिपिन महाजन (एच.आर. पुणे विभाग), श्रीमती.अर्चना करांडे ( मुख्याध्यापिका - पोदार इंटरनॅशनल स्कूल सारा सिटी )


या सर्व मान्यवरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दाखवली होती. शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. सुधांशू नायक (पोदार इंटरनॅशनल स्कूल तळेगाव) यांनी मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांचे आपल्या शब्दसुमनांतून स्वागत केले व आपल्या भाषणातून शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. तसेच विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक व आभार व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा व बक्षिसपात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यंदा विद्यार्थ्यांसह प्राचार्य, उपप्राचार्या तसेच शिक्षकांमध्ये मोठा उत्साह होता. तो विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनातून व्यक्त झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध 'तेनाली रामा' यांच्या चातुर्याचे तसेच त्यांच्या जीवनप्रवासाचे नाटय तसेच, नृत्यांना, गाण्यांना प्रेक्षकांचा टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह पालकांचे नेहमी मिळणारे सहकार्य यांच्यामुळे कार्यक्रमाला आणखीनच शोभा आली.

अशा पद्‌‌धतीने उत्साहवर्धक वातावरणात माननीय प्राचार्य व उपप्राचार्या यांच्या मार्गदर्शनाने आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे व जगाला जोडण्याचे महत्त्व द्विगुणीत झाले. शाळेचे प्राचार्य माननीय सुधांशू नायक सर, शाळेच्या उपप्राचार्या अर्चना गडकरी मॅडम सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिवस उत्साहवर्धक व ऐतिहासिक ठरला.