प्रियदर्शनीज लिटिल स्टार अकॅडमी(स्कूल) चा पाचवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा.

486 views


Author : Admin
Publisher : Admin
Update : 5 months ago
Date : Wed Feb 07 2024

image

तळेगाव दाभाडे:- प्रियदर्शनीज लिटिल स्टार अकॅडमी(स्कूल) चा पाचवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कीर्तनकार सौ.स्नेहलता साठे मॅडम यांची उपस्थिती होती.

प्रियदर्शनीज लिटिल स्टार स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन दि.2 फेब्रुवारी2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरे झाले.

स्कूलच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते यावर्षी भारतभर साजऱ्या करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अवचित्य साधून स्कूल ने प्रभू श्रीरामांना मानवंदना देण्यासाठीच प्रभू *श्रीराम* या संकल्पनेवर आधारित स्नेहसमेलनाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध कीर्तनकार सौ स्नेहलता साठे मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या शाळेतील बालचमूना प्रभू श्रीरामलल्ला आणि पालकांना लहान मुलांवर संस्कार कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष श्री करण हेंद्रे शाळेच्या संचालिका सौ प्रियदर्शनी हेंद्रे माजी नगरसेविका सौ प्राची हेंद्रे कमिटीच्या उपाध्यक्ष कल्पना चव्हाण सचिव पराग चव्हाण खजिनदार पूजा चव्हाण सदस्या अनिता धारके  उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विध्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. प्रभू श्रीराम यांचा जीवनपट हा विद्यार्थ्यांनच्या नृत्यातून आणि नाट्यातून सादर करण्यात आला. यामुळे सर्व वातावरण राममय झाले होते. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचे नेहमी मिळणारे सहकार्य यामुळे कार्यक्रमाला आणखीनच शोभा आली.

दरवर्षी प्रमाणे शाळेतील Best teacher of the year हे award शाळेच्या शिक्षिका सौ कृष्णाली गीध यांना व Best student of the year हे award कु.निल परदेशी यांना मिळाले .

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ प्रियदर्शनी हेंद्रे यांनी केले सूत्रसंचालन धनश्री हेंद्रे यांनी केले व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री करण हेंद्रे यांनी केले.

  शाळेचे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने स्नेहसंमेलनाचा दिवस उत्साहवर्धक व ऐतिहासिक ठरला.