244 views
..
तळेगाव दाभाडे - नू. म.वि. प्र. मंडळ संचालित पु.वा.परांजपे विद्यामंदिरात दिनांक २८/४/२०२४ रोजी सन २०००-२००१ मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन उत्साहात पार पडले.
या समारंभासाठी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री पोटे सर , सन २०००-२००१ इ. १०वी ला अध्यापन करणारे अध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच शंभर पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व अध्यापकांची शाळेपर्यंत आणण्याची व्यवस्था प्रशांत ठोके व नचिकेत देशमुख यांनी केली होती. शिक्षकांच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळीचे रेखाटन अपर्णा आसवले व गीतांजली खांदवे या विद्यार्थिनीनी केले. सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
एक दिवसीय शाळेची सुरुवात शाळेची घंटा वाजवून राष्ट्रगीत सादर करून झाली. राष्ट्रगीता नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थिनी श्वेता शिर्के हिने सरस्वती स्तवन सादर केले.
यानंतर या बॅचमधील ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना देवाज्ञा झाली आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विद्यार्थी प्रसाद सावंत याने समारंभाचे प्रास्ताविक सादर केले.
संपूर्ण उत्साही वातावरणात प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख "मी सध्या कोण" या सदरातून करून दिली यानंतर सर्व अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक पोटे सर सेवक गंगाराम सुपे सर्वांना माजी विद्यार्थ्यांकडून श्रीफळ ,शाल, भेटवस्तू ,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यात अध्यापकांमध्ये श्री वाकचौरे सर ,जाधव सर ,शिंदे सर, आगळमे सर , भगत सर ,अंबोरे सर ,वंजारे सर ,कुलकर्णी मॅडम, गायकवाड मॅडम ,औंढेकर मॅडम, भेगडे मॅडम, गंभीर मॅडम ,केसकर मॅडम, झेंडे मॅडम ,नागपूर मॅडम, जोशी मॅडम, गावडे मॅडम , कडोलकर मॅडम ,वाळुंज मॅडम, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यशवंत भेगडे, शंकर ढोरे ,बाळूमामा जाधव, संजय कसाबी ,अनिल नखाते हे उपस्थित होते.
यानंतर माजी विद्यार्थी स्मिता घारे, प्रशांत ठोके, सुरज दिघे, व गणेश पडवळ यांनी शाळेविषयी भावना मनोगतातून व्यक्त केल्या. गिरीश चौरे यांनी कवितेतून शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला.
कुलकर्णी मॅडम ,गायकवाड मॅडम, भगत सर , आगळमे सर यांनी आपले शिक्षक मनोगत व्यक्त केले .सर्वांनी आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शाळेविषयीच्या आठवणी जागृत केल्या . यानंतर मुख्याध्यापक पोटे सर यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले, "माजी विद्यार्थ्यांच्या या संमेलनामुळे शाळेचा पट वाढण्याची आशा त्यांनी व्यक्त केली".
माजी विद्यार्थ्यांकडून शाळेत एक मोठे घड्याळ भेटवस्तू म्हणून देण्यात आले.
या सत्राचे सूत्रसंचालन सुजित निंबळे, माधवी पोरे आणि दीप्ती चाफळकर यांनी केले.
यानंतर या एक दिवसिय शाळेत मधली सुट्टी पण देण्यात आली. या सुट्टीत सर्व शिक्षक ,माजी विद्यार्थी यांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. या भोजनाचे आयोजन संदीप सातकर आणि रोहित टेंभुर्णीकर या माजी विद्यार्थ्यांनी केले होते.
नंतर दुसऱ्या सत्रामध्ये विविध करमणुकीचे खेळ ,गाणी, गप्पा ह्यांचा माजी विद्यार्थी मनमुराद आनंद लुटला. या दुसऱ्या सत्राचे नियोजन शितल गायकवाड, प्रसाद सावंत यांनी केले होते यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली.
एक दिवसीय शाळेची सांगता शेवटची घंटा वाजवून पसायदान व वंदे मातरम ने करण्यात आली.
या सर्व कार्यक्रमाचे you tube live प्रक्षेपण तसेच सुरेख छायाचित्रण सुरज दिघे या माजी विद्यार्थ्यांने केले.
हे संमेलन यशस्वी करण्यासाठी गीतांजली खांदवे ,गिरीश चौरे ,गोकुळ किरवे ,संदीप सातकर, अभिजीत चौधरी ,आरती राणा, तनुजा गलियत ,प्रसाद सावंत ,प्रवीण गरुड ,अविष्कार कबाडे ,रोहित टेंभुर्णीकर ,प्रशांत ठोके ,अनिता धामणकर ,गणेश दवणे,मोनाली थोरवे, सुजाता ठोंबरे ,महेश गंगाप्रसाद, गौरव काळकर, मनीष मेढी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.