बौर येथील स्वामी समर्थ इंग्लिश स्कूलचे १० वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

314 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 5 months ago
Date : Sat Feb 10 2024

image..

मावळ :- बौर येथील स्वामी समर्थ इंग्लिश स्कूलचे १० वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या उत्साहात साजरा झाला.

परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी लुप्त होत चाललेली मराठी परंपरा /सण विद्यार्थांना कळावी या उद्देशाने ' मराठी सण' या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.


उद्घाटनपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब मोहोळ यांनी मराठी सण अलीकडच्या काळात लोप पावत चालले आहेत त्या संदर्भात हा प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कलेचे नैपुण्य दाखवायलाच हवे. यातूनच उद्याचे कलाकार घडतात असे सांगून मराठी सणांवर आधारित स्नेहसंमेलनास शुभेच्छा देऊन उद्घाटन झाले व कार्यक्रमाला सुरुवात झाली.


या कार्यक्रमासाठी उद्योजक बबनराव माणे , धरणग्रस्त संघटना अध्यक्ष नारायण बोडके , पांडुरग मोढवे, सहादु मोहोळ, पत्रकार रवि ठाकर, दत्ताभाऊ ठाकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. हे स्नेहसंमेलन केवळ नाटय, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी केले व विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे भरभरून कौतूक देखील केले.


शाळेच्या मुख्याध्यापिका मानणीय गौरी गोपीशेट्टी यांनी मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांचे आपल्या शब्दसुमनांतून स्वागत केले व आपल्या भाषणातून शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. तसेच विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक व आभार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.


यंदा विद्यार्थ्यांसह प्राचार्य तसेच शिक्षकांमध्ये मोठा उत्साह होता. तो विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनातून व्यक्त झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध ' मराठी सणांवरील' नाटय तसेच, नृत्यांना, गाण्यांना प्रेक्षकांचा टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.


या कार्यक्रमाला शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह पालकांचे नेहमी मिळणारे सहकार्य यांच्यामुळे कार्यक्रमाला आणखीनच शोभा आली. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम खिरिड , अश्विनी दळवी , सोनल

मोहोळ यांनी केले.