स्वामी समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात.

359 views

...


Author : Admin
Publisher : Admin
Update : 4 months ago
Date : Fri Mar 08 2024

image..वडगाव मावळ :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ०७ मार्च २०२४ स्कूलमध्ये महिला दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन, फूड फेस्टिवल इत्यादी उपक्रम घेण्यात आले.


आजच्या जगात प्रत्येक घटकात आपल्याला विज्ञान पाहण्यास मिळते. अशी एकही गोष्ट नाही जिथे विज्ञान आणि गणित नाही. विज्ञानाने दैनंदिन जीवन व्यापून टाकले असले तरी अंधश्रद्धेचा पगडा आजही कायम आहे. आपण विज्ञानदिन साजरा करतो हे तर महत्त्वाचे आहेच, परंतू आपण ते आचरणात आणणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे,'विज्ञान दिन साजरा करण्यासोबत तो आचरणात आणणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे मत भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मोहोळ यांनी व्यक्त केले. स्वामी समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन प्रसंगी ते बोलत होते.विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विज्ञान आणि गणित विषयावरील प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये हायड्रॉलिक, इलेक्ट्रिक, शेतीविषयक, अवकाशविषयक, औषधीविषयक, गणित विषयक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. 

सचिव स्वप्निल मोहोळ , प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले सर्व पालक आणी सर्व स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल चा स्टाफ यावेळी उपस्थित होता