322 views
वडगाव मावळ:- मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढेचा विद्यार्थी शुभम निलेश सुतार याने खुल्या प्रवर्गातून जवाहर नवोदय परीक्षेत यश मिळवल्याने त्याचा जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप,पुणे येथे निवड झाली आहे.
या परीक्षेत जिल्ह्यातून फक्त ८० मुलांची निवड केली जाते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते.
आढे शाळेतील इयत्ता पाचवीच्या तेरा मुलांतून अकरा मुलं परीक्षेला बसले होते त्यातील सर्व मुलं पास होऊन शुभम निलेश सुतार याची नवोदय साठी निवड झाली तो तालुक्यातील सर्व ६९३ मुलांना मागे टाकून तालुक्यातून पहिला मान मिळून नवोदय साठी पात्र ठरला आहे.
शुभामला मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक अमित सारडा यांनी योग्य नियोजन करून ज्यादा तास व प्रश्नपत्रिकेचे सराव घेतले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आरती दळवी व शाळेतील सहकारी शिक्षक केंद्राचे केंद्रप्रमुख ताते , काले कॉलनी बीटचे विस्तार अधिकारी शोभा वहिले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवरंग सुतार, उपाध्यक्ष ,माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार गावचे सरपंच सुनीताताई सुतार व पालक यांनी शुभम सुतार व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिली.