बापूसाहेब भेगडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

342 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 3 months ago
Date : Sun Oct 27 2024

image..


मावळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार बापूसाहेब जयवंतराव भेगडे उद्या (सोमवारी, दि. २८) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी

सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

पंचमुखी मारुती मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य पदयात्रेला सुरुवात होईल. बापूसाहेब भेगडे दुपारी १२ वाजता वडगाव मावळ तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज भरल्‍यानंतर वडगाव मावळ

पंचायत समिती चौक येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करतील. मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत असून, वाढता पाठिंबा लक्षात घेता मोठ्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे, असा दावा बापूसाहेब

भेगडे यांनी केला आहे.

सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.