562 views
.
मावळ :- दि. २९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०९:०० वा. चे सुमारास एक २३ वर्षीय महिला बेपत्ता झाली असून अद्याप पर्यंत मिळून आली नसल्याने या संदर्भात हरविलेल्या महिलेच्या पती ने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शिलाटने येथे वास्तव्यास असलेली सिर्जनादेवी उपेंद्र महतो वय २३ वर्षे ही दवाखान्यामध्ये जावून येते असे सांगून एकटीच घराचे बाहेर गेली ती परत आली नाही.
हरविलेल्या महिलेचे वर्णन : नाव सिर्जनादेवी उपेंद्र महतो वय २३ वर्षे सध्या राहनार शिलाटणे पो. कार्ला ता. मावळ जि. पुणे. मुळ राहनार वॉर्ड नं. ५, रसूलपूर, पो. ढेन बरहरवा, ता. मजरगंज जि. सितामरही. राज्य बिहार. उंची ५ फुट, रंग - निमगोरा, केस काळे लांब, कानामध्ये पिवळे धातुचे कर्नफुले, गळयामध्ये माळ, पायामध्ये काळे रंगाची चप्पल, पिंक रंगाची साडी, पिंक रंगाचा ब्लाऊज, भाषा - हिंदी व मैथली बोलते.
सदर वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळून आल्यास त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीसांना माहिती द्यावी असे पोलिसांनी नागरीकांना आवाहन केले आहे.