152 views
...
शिरे येथील रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न
वडगाव मावळ :- शिरे येथील अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन समारंभ स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.रस्त्याच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
मरिमाता मंदिराकडे जाणारा रस्ता विकसित करावा अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी केली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शेळके यांनी त्वरित दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व कामास शुभारंभ देखील करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आहे.
या भूमिपूजन समारंभास श्रीकांत मोढवे, माजी उपसरपंच नवनाथ मोढवे, रामदास शेटे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ मोढवे, स्वाती शेटे, सुनिता पिलाणे, तानाजी पवार, जयेश शेटे, साहेबराव मोढवे, अरुण मोढवे, सुनिल मोढवे, तेजस मोढवे, सुभाष मोढवे, विलास भांगरे, शंकर मोढवे, नथु पवार, प्रतिक घोजगे, सुशांत बालगुडे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित
होते.