एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे ''शिवराज्याभिषेक दिन'' उत्साहात साजरा

50 views

...


Author : Admin
Publisher : Admin
Update : 1 month ago
Date : Mon Jun 10 2024

image...

कृपया प्रसिद्धीसाठी


 एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे ''शिवराज्याभिषेक दिन'' उत्साहात साजरा 


तळेगाव दाभाडे :   


रयतेच्या हिताचा कारभार कसा करावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्यकारभार. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रचे नव्हे तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ०६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. हा दिवस दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो.  


गुरुवार दिनांक ०६ जून २०२४ रोजी माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 


यावेळी वैद्यकीय महाविद्यालय, फिजिओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थी यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल त्यांचे विचार व मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी शिवगीते व शिवगर्जना सादर केली.  


यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या कुलकर्णी, प्रा. डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल घोडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूर्वा मांजरेकर, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय गोपाळघरे तसेच वैद्यकीय महाविद्यालय, फिजिओथेरपी आणि नर्सिंग महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


सदर कार्यक्रम उत्तमरीत्या आयोजित केला याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ तुषार खाचणे, प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी,  कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले व कौतुक केले.


जनसंपर्क व प्रसिद्धी विभाग

एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व

डॉ भासतग्रा रुग्णालय तळेगाव दाभाडे