''एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये "जागतिक मौखिक आरोग्य दिन" साजरा

47 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 3 weeks ago
Date : Fri Mar 22 2024

image..


तळेगाव दाभाडे : बुधवारी (दि.20 ) तळेगाव दाभाडे येथील माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये "जागतिक मौखिक आरोग्य दिन" साजरा करण्यात आला.


दंतचिकित्सा विद्याशाखेने वैद्यकीय तसेच दंत या विभागांच्या समन्वयासाठी दंतचिकित्सा या विषयावर एकदिवशीय वैद्यकीय परिषद या पहिल्या अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. या विशिष्ट कार्यक्रमाचे आयोजन दंतचिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.


दंतचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.ज्ञानेश कन्नूर यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी यावेळी मौखिक आरोग्यावर सामान्य आरोग्याचा निर्देशांक म्हणून भर दिला. दंतचिकित्सा आणि वैद्यकशास्त्रातील अंतर भरून काढण्यासाठी हा कार्यक्रम संकल्पनात्मकदृष्ट्या एक छोटासा प्रयत्न आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.


डॉ. यशवंत इंगळे, दंतचिकित्सा प्रमुख, वायसीएम हॉस्पिटल यांनी दंतवैद्यक शास्त्रातील मूलभूत ते अत्याधुनिक दंत प्रक्रियांबद्दल व्याख्यान दिले. प्रख्यात चिकित्सक आणि इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. विजय ताम्हाणे यांनी दंतचिकित्सा मधील सामान्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींवर उपस्थितांना संबोधित केले.


यावेळी दंतचिकित्सा प्रक्रियेदरम्यान वैद्यकीय आपत्कालीन घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्राचे सूत्रसंचालन डॉ. हर्ष देसाई, सहाय्यक प्राध्यापक, दंतचिकित्सा विभाग यांनी केले. या चर्चासत्रामध्ये डॉ. शिल्पा गुरव, विभागप्रमुख भूलशास्त्र विभाग, डॉ. लीना शिबू, सहयोगी प्राध्यापक भूलशास्त्र विभाग, डॉ. प्रकाश पाटील, दंत व मुखशल्य चिकित्सक आणि इम्प्लांटोलॉजिस्ट, डॉ. यशवंत इंगळे, विभागप्रमुख दंतचिकित्सा, वायसीएम हॉस्पिटल आणि डॉ. विजय ताम्हाणे वरिष्ठ इम्प्लांटोलॉजिस्ट यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्रामुळे खाजगी तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्सकांना विशेष लाभ झाला.


भूलशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. अनिता कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ''एअरवे मॅनेजमेंट आणि सीपीआर हॅन्ड्स ऑन'' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.


यावेळी संस्थेच्या प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. दत्तात्रय गोपळघारे, प्राध्यापक स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र उपस्थित होते तसेच मावळ तालुका व पिंपरी चिंचवड मधील अनेक खाजगी दंत चिकित्सक उपस्थित होते. दंतचिकित्सा विभाग व भूलशास्त्र विभागाचे डॉक्टर्स व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉ.अनुजा कांबळे आणि डॉ. प्राची पंदारकर यांनी सीएमईच्या विविध व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. डॉ. गायत्री मोरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित केल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ तुषार खाचणे, प्राचार्या डॉ संध्या कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ विरेंद्र घैसास व कार्यकारी संचालिका डॉ सुचित्रा नागरे यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.