167 views
..
वडगाव मावळ:- आज आपल्या त्या जैविक साखळीतून चिमण्या दिवसेंदिवस नामशेष होत चाललेल्या आहेत. चिमणी संवर्धन व्हावे, चिमण्यांची संख्या वाढावी म्हणून २० मार्च जगामध्ये सगळीकडे जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.
प्रचंड वृक्षतोड, सिमेंट काँक्रीटची जंगले, व शेतीवर होणारी औषध फवारणी, प्रचंड प्रमाणात पाण्याचे प्रदूषण या सगळ्या गोष्टींमुळे प्राणी व पक्षी यांच्या जीवित्तांवर होणारा प्रचंड परिणाम तसेच उन्हाळ्यामध्ये प्रचंड उन्हाच्या तडाख्यात चिमण्यांचे अस्तित्व कमी होत चालले आहे. चिमण्यांची संख्या वाढावी यासाठी मोरया प्रतिष्ठान व आविज् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिमणी संवर्धन प्रकल्पाकरिता मोरया प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयात कृत्रिम घरटी बनविण्याचे काम हाती घेऊन सुमारे २५० चिमण्यांची घरटी बनविण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, आविज् फाऊंडेशन चे संस्थापक श्री. अविनाश नागरे सर, मा नगरसेविका पूनम जाधव आणि वडगाव शहरातील पक्षीप्रेमी नागरिक उपस्थित होते.
पक्षी संवर्धनासाठी गेल्या आठवड्याभरात नावनोंदणी केलेल्या सुमारे १५० नागरिकांना चिमण्यांची घरटी विनामूल्य भेट देण्यात आली. यावेळी वडगाव शहरातील पक्षीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.