441 views
विराज वाघवले ११८बैठका
वडगाव मावळ :- होळी व धूलिवंदन सणानिमित्त जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्टतर्फ पारंपारिक शिवकालीन मर्दानी स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये दगडी गोटी खांद्यावर घेऊन २८५ बैठका मारुन सौरभ नामदेव ढोरे यांनी रचला नविन विक्रम सौरभ ढोरे स्व. पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ वस्ताद उमेश ढोरे यांच्यावतीने चांदीची गदा देण्यात आली. तसेच मोरया प्रतिष्ठान यांच्या वतीने चांदीचे कडे देण्यात आले. व अमित मुसळे यांच्या वतीने मोठ्या गोटीवर बैठक मारणाऱ्या खेळाडूला ट्रॉफी देण्यात आली.
वडगाव मावळ येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात सोमवारी सकाळी ९ वाजता शिवप्रतिमेच्या पूजन व मानाची दगडी गोटी पूजन पोटोबा देवस्थानचे उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, किरण भिलारे, सुनिलभाऊ चव्हाण, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अमोल भोईरकर, संचालक गणेश विनोदे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनंता कुडे, बिहारीलाल दुबे, सुधीर म्हाळसकर, वस्ताद उमेश ढोरे आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार सुनील शेळके, बाबुराव वायकर, भास्करराव म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, सिनेअभिनेते प्रतीक मोहीते, अशोक सरपाटील, सुधाकर ढोरे, बापूसाहेब वाघवले, किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, विलास दंडेल, राजेंद्र वहीले, रवींद्र काकडे, अर्जुन ढोरे, खंडू भिलारे, अतिश ढोरे दिलीप चव्हाण बाळासाहेब तुमकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गुणवंत खेळाडूंना स्व. पै. केशवराव ढोरे क्रीडा पुरस्कार देऊन या मध्ये नितीन म्हाळसकर, सौरभ ढोरे व सुरेंद्र भिलारे या गत विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले.
कुस्ती क्षेत्रात आपल्या मावळ तालुक्याचे नाव लौकिक करणाऱ्या पैलवानांना स्व.पै. केशवराव ढोरे पुरस्कार देऊन विशेष सत्कार करुन या पैलवानांना सन्मानित करण्यात आले. खंडू वाळुंज, भरत लिम्हण, विशाल भोईर, खंडू कालेकर, विकास येनपुरे, संदीप काळे, अमोल राक्षे, नागेश राक्षे, तुषार येवले, प्रतीक देशमुख, अजित करवंदे, विपुल आडकर, सावरी सातकर, सनम शेख
दगडी गोटीवर सर्वात जास्त बैठका मारणाऱ्या वरिष्ठ गटातील विजेत्यांना अरुण वाघमारे, सुनील दंडेल व अतुल ढोरे यांच्यावतीने तर कुमार गटातील विजेत्यांना विकी म्हाळसकर, अशोक घुले व सागर बरदाडे यांच्या वतीने चषक देण्यात आले.
वरिष्ठ गट सौरभ ढोरे २८५ बैठका, किशोर धोत्रे २१२ बैठका, तेजेस भिलारे ६६ बैठका, नितीन म्हाळसकर ३५बैठाक, (मध्य गोटी), अभिजित दिसले ३५बैठका, चिराग वाघवले २६बैठका (मोठी गोटी)
कुमार गट विराज वाघवले ११८बैठका, हर्ष चव्हाण ८० बैठका, यशराज चव्हाण ८० बैठका, आर्यन ढोरे ५१बैठका, देवेश पाटील ३३बैठका, गणेश तुमकर २१ बैठका, विनित वहीले १८ बैठका, प्रथमेश नवघने १७बैठका, साकक्षी म्हाळसकर २८ बैठकि, मयुरी लोळे ७बैठका
कार्यक्रमाचे आयोजन जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्ट व शिवजयंती उत्सव समितीचे यांच्या वतीने करण्यात आले होते.