870 views
..
वडगाव मावळ
किवळे येथे श्री.बापदेव महाराजांच्या उत्सवानिमित्त झालेल्या भव्य छकडी स्पर्धेत करंजगावचे शिवाजीराव टाकवे यांची सम्राट व महिब्या ही बैलजोडी ठरली बापदेव महाराज केसरी किताबाचे मानकरी.
किवळे येथे झालेल्या ही शर्यत
छकडी सेकंद काटा शर्यतीतील सर्वात मोठी स्पर्धा ठरली.भरघोस बक्षिसे,भव्य आयोजन,योग्य निर्णय,
धागा पद्धतीचे घड्याळ ही यात्रेची वैशिष्टे ठरली.या स्पर्धेत
एकशे सत्तर छकडी मालकांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्रातून पुणे,नाशिक सातारा कोल्हापूर संभाजीनगर, मुंबई,कोकण आणि जालना भागातील स्पर्धक सहभागी होते.अंतिम फेरीत शिवाजीराव टाकवे-कु.शिवण्या समीर शेलार स्वामी गायकवाड-विलास काशीकर,
गणेश देशमुख,देवराम गायकवाड-श्रीराम राईसमिल,कवडे-शेटे जुगलबंदी,काजळे-कुटे जुगलबंदी,थोरवे-शेलार जुगलबंदी यांचा अनुक्रमे सात क्रमांक आले.त्यांना दुचाकी देऊन सन्मानित करण्यात आले.