खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीआधीच महायुतीच्या दहा जागा बिनविरोध

435 views

उर्वरित ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत.


Author : Admin
Publisher : Admin
Update : 5 months ago
Date : Sun Feb 18 2024

image...

वडगाव मावळ :- मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना (शिंदे गट) अशी महायुती च्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय झाला असून निवडणुकीआधीच महायुतीच्या दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत.


राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे महायुतीचा पॅनल जाहीर केला आहे.


खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून एकूण १९ जागांपैकी अ वर्गातील ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत तर ब वर्गातील २, महीला प्रतिनिधी २ व भटक्या विमुक्त जाती गटातील १ अशा एकूण १० जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना (शिंदे गट) महायुती च्या वतीने महायुती सहकार पॅनल च्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे. तर काँग्रेसनेही क वर्ग, इतर मागास प्रवर्ग गटात उमेदवार दिले आहेत.


बिनविरोध विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे :

तळेगाव : रुपेश घोजगे, साळुंब्रे : बाजीराव वाजे, लोणावळा : भरत येवले, कोथूर्णे : ज्ञानेश्र्वर निंबळे, आंबेगाव : शहाजी कडू

ब वर्ग - प्रमोद दळवी, आशा मारुती खांडभोर

महीला प्रतिनिधी : मनीषा आंबेकर, सुनीता केदारी

भटक्या विमुक्त जाती - शरद नखाते


महायुती पॅनल मधील उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

अ वर्ग -

टाकवे गट : शिवाजी असवले (महायुती), प्रकाश देशमुख, शांताराम लष्करी, शिवली गट : धनंजय टिळे (महायुती), विष्णू घरदाळे, खडकाळा: संतोष कोंढरे (महायुती), रमेश भुरुक, वडगाव : निलेश म्हाळसकर(महायुती), एकनाथ येवले,

क वर्ग - किरण हुलावळे, माणिक गाडे, गणेश विनोदे (तिघेही महायुती), बबन आरडे, मारुती असवले, सदाशिव सातकर,

इतर मागास प्रवर्ग : अमोल भोईरकर (महायुती), काळूराम थोरवे, खंडू तिकोणे

अनुसूचित जाती जमाती : मधुकर जगताप (महायुती), नारायण चिमटे,


महायुतीची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार !


राज्यात महायुती सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेली मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात असून या निवडणुकीत महायुतीची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार बाळासाहेब नेवाळे, विठ्ठलराव शिंदे, भास्करराव म्हाळसकर, निवृत्ती शेटे, एकनाथ टिळे, गुलाबराव म्हाळसकर, सचिन घोटकुले, भाऊसाहेब गुंड, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, शरद हुलावळे, विठ्ठल घारे, पंढरीनाथ ढोरे, बाळासाहेब भानुसघरे, नंदकुमार पदमुले, सुनील दाभाडे, राजेश मुऱ्हे, बाबुलाल गराडे, अंकुश देशमुख, सुधाकर ढोरे, रोहिदास गराडे, दत्ता केदारी, यदुनाथ चोरघे आदींच्या उपस्थितीत झालेल्या नियोजनाच्या बैठकीत घेण्यात आला.